कृषी व व्यापार

कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवरील उपसा बंदी पूर्ण शिथील  

 

        सांगली  : कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर सांगली पाटबंधारे  विभागामार्फत दि. 23 जून 2023 ते  दि. 26 जून 2023 पर्यंत उपसा बंदी आदेश जारी करण्यात आला होता. तथापी, दि. 25 जून 2023 पासून उपसा बंदी पूर्ण शिथील करण्यात आली असून सर्व योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत सुरू करण्याबाबत सांगली पाटबंधारे विभागातर्फे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी  लि. मंडळ सांगली/सातारा यांना कळविले आहे. अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!