क्राईममहाराष्ट्र
कोल्हापूर सी. पी. आर. जिल्हा शल्यचिकित्सलयाचा वरिष्ठ लिपीक हुसेनबाशा शेख याला 5 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरःअनिल पाटील
तक्रारदार हे कोल्हापूरातील सी.पी. आर रूग्णालयात अधिपरिचारिका म्हणून नोकरीस असून त्यानां स्थायित्व प्रमाण पत्र दिल्याच्या मोबदल्यात 5 हजार रूपये लाचेची मागणी करून ती लाच स्विकारतानां आज दूपारी सी.पी. आर हाॅस्पीटलचा जिल्हाशल्यचिकित्सालयाचा वरीष्ठ लिपीक हूसेनबाशा कादरसाब शेख ( वय 47) रा. शनिवार पेठ”कोल्हापूर याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नितीन कूंभार”””संजीव बंबरगेकर”” विकास माने””सूनिल घोसाळकर यांनी केली.