महाराष्ट्र
ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगलीकडे प्रयाण. शुक्रवार, दि. 27 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5.22 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन व सांगली विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव.