महाराष्ट्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीचे आधारस्तंभ : प्रा. डॉ. सुरेश शिंदे

भिलवडी  येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्वयातीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीचे आयोजन

 

 लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी  भिलवडी  येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे केले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे हे होते . यावेळी डॉ. एस डी. कदम उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे पाहुणे प्रा. सुरेश शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस म्हणून राज्यकारभार साभांळत असताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले . देशातील अनेक संस्थाने इंग्रजांनी खालसा केली पण शाहूंच्या संस्थानापर्यंत पोहचले नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शाहूंच्या आठवणी अनेक आहेत पण केवळ आठवणी उगाळत बसण्याऐवजी त्या आठवणीतून सामाजिक , सांस्कृतीक व लोकाभिमुक कार्य , आचार , विचार समजावून घेतले पाहिजेत . त्यांनी केलेल्या आरोग्य ‘ शिक्षण , धर्म , विविध सोई सवलती , अधिकार याबाबत त्यांची मानसिकता काय होती हे समजावून घेतले पाहिजे , प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले पण का केले हे समजावून घेतले पाहिजे . त्यांनी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेवर १ लाख का खर्च केले यावर विचार झाला पाहिजे . त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले . त्यांच्यावर अनेक प्रकारचे हल्लेही झाले पण त्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र घेवून जाण्याच्या मानसिकतेमुळे त्यांनी सर्व सहन केले . शिक्षण , आरोग्य , धर्म , समाज ,शेती सुधारण्यासाठी त्यांनी आयुष्यभर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत . त्यांनी समाज सुधारणा हेच मुख्य ध्येय ठेवले होते . असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे म्हणाले की, शाहू राजांनी समाजामध्ये अनेक सुधारणा केल्या समाजातील थोर विचारवंत ओळखून त्यांच्याकडे समाजाचे नेतृत्व दिले. समाजातील सर्वच घटकांसाठी त्यांनी सातत्याने लक्ष घालून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला कला , क्रीडा . शिक्षण अशा अनेक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले असे ते म्हणाले
.. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा व्ही . एस. यादव यांनी केले सूत्रसंचालन डॉ. एस.डी. कदम यांनी केले तर आभार डॉ. व्ही.एस. विनोदकर यांनी मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!