महाराष्ट्रराजकीय
सांगली जिल्हा; आठही विधानसभा मतदार संघात एकही उमेदवार अर्ज माघार नाही
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

सांगली :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात वैधपणे नामनिर्दिष्ट केलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवारांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी मागे घेतली नाही.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.