विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : संग्रामसिंह छत्रे

दर्पण न्यूज मिरज : महाविद्यालयीन तसेच उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल व राखीव गटातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध शासकीय मोफत प्रशिक्षण, शासकीय योजना, आणि शिष्यवृत्ती या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. संग्रामसिंह छत्रे (समतादुत समन्वयक-सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण विभाग, सांगली) यांनी केले. ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी व अमृत या शासकीय योजना तसेच स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अभिछात्र वृत्ती अशा विविध शासकीय योजनांची जाणीव व जागृती तसेच अंमली पदार्थ प्रतिबंध मोहिम या अभियानांतर्गत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील हे होते.
श्री. छत्रे पुढे म्हणाले की, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थिती नसेल तर शिक्षण थांबवू नये. समाजकल्याण विभाग सांगली मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन अर्ज करावा. योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याची प्राचार्यांनी नोंद घ्यावी अशी शेवटी सूचना केली.
यावेळी श्री गजानन सोनवणे यांनी अंमली पदार्थ प्रतिबंध मोहिमेअंर्गत व्यसनाधीनता व त्याचे तोटे, समुपदेशनाचे फायदे याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तीमत्व घडवावे. तसेच शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी सारथी योजनेचे समन्वयक ऋषीकेश पाटील, डॉ. मिहीर क्षीरसागर, प्रा. राजू खोत, यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अरूणा सकटे, तर आभार डॉ. शिल्पा खैरमोडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.