करनूर येथे ‘नामदार चषक 2025’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप ; नविद मुश्रीफ यांच्या हस्ते बक्षीस वितरण

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- करनूर, ता. कागल येथे ‘एक गाव, एक टीम’ या संकल्पनेतून आयोजित ‘नामदार चषक 2025’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप झाला.*
गोकुळ दूध संघाचे चेअरमन आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. नविद मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
*स्पर्धेतील विजेते संघ:*
– 🥇 प्रथम क्रमांक: *सांगाव स्पोर्ट्स*
– 🥈 द्वितीय क्रमांक: *सरनोबतवाडी स्पोर्ट्स*
– 🥉 तृतीय क्रमांक: *नेर्ली स्पोर्ट्स*
– 🎖️ उत्तेजनार्थ: *बाचणी स्पोर्ट्स*या स्पर्धेचे संयोजन वासीम नायकवडी, तौफिक शेख, सागर खोत व अझरुद्दीन शेख यांनी केले होते.
कार्यक्रमास विकास पाटील, मयुर आवळेकर, इम्रान नायकवडी, प्रविणकुमार कांबळे, राजमहमंद शेख, भगवान चव्हाण, अल्ताफ शेख, समीर शेख, काकासो चौगुले, वैभव आडके, शिवाजी गुरव, रामराव भोसले, दस्तगीर जमादार, जब्बार नायकवडी, बाळासो धनगर, पोपट जगदाळे (सरपंच), शब्बीर आलासे, विश्वास चव्हाण, सुरेश परीट, कृष्णात चव्हाण, विजय चव्हाण, तौहिद शेख तसेच परिसरातील क्रिकेटप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.