महाराष्ट्र

भिलवडीत चक्काजाम : सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गात आरक्षण देण्याची मागणी

 

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अनुसूचित जमाती (एसटी ) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप आदी परीसरातील सकल धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करून आष्टा-तासगाव महामार्ग रोखला होता. धनगर समाजाचे युवा नेते व हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

या रास्ता रोको आंदोलनामुळे भिलवडी येथे सुमारे  दीड तास वाहतूक बंद झाली होती. आंदोलनात धनगर समाजाच्या बांधवांनी पारंपरिक धनगरी ढोल वाद्य घेऊन ते वाजवून निषेध व्यक्त केला.

धनगर  समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाचे नेते व भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनाला पलूस तालुक्यासह भिलवडी येथे चांगला प्रतिसाद मिळाला.

धनगर समाजाचे युवा नेते व हिंदुस्थान मल्हार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात विविध गावांतील लोकांनी सहभाग दर्शवला होता.यावेळी धनगर समाजाच्या बांधवांनी अनेक घोषणा बाजी केली

यावेळी भिलवडी पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलगस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी भिलवडी, माळवाडी,अंकलखोपसह परीसरातून धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

पलूस तहसीलचे प्रतिनिधी म्हणून भिलवडीच्या मंडळ अधिकारी सुरेखा जाधव यांनी आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करून सकल धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी ) संवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीचे लेखी निवेदन स्वीकारुनले. तसेच हे निवेदन सरकारपर्यंत पोचवले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!