गोकुळ दूध संघाचे दुग्ध व्यवसायातील कामकाज कौतुकास्पद :
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे प्रतिपादन

कोल्हापूरः आनिल पाटील
धडाडीचे निर्णय घेणारे शिस्तप्रिय अधिकारी महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव .तुकाराम मुंढे यांची गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे व गोकुळ मुबई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी मुंबई मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले कि महाराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदानअसून सहकारी दुग्धव्यवसाया मध्ये गोकुळ चे नाव आदर्शव आहे. तसेच गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील एक नावाजलेला ब्रँड असून तो योग्य नियोजन,शासन यंत्रणेची मदत व संघानियमांची अमलबजावणी,तसेच दूध उत्पादक केंदबिंदू मानून होत असलेले दैनंदिन कामकाज यामुळेच गोकुळ दूध संघ सहकारातील आदर्श संस्था बनला आहे. खास करून गोकुळ राबवत असलेली वासरू संगोपन योजनेचे कौतुक करून गोकुळच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. व भविष्यात शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागा मार्फत कोणत्याही प्रकारची गरज भासलेस कोणती हि वेळ न पाहता मला संपर्क करा मी सदैव गोकुळच्या हितासाठी मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले .यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे यांनी.सध्याच्या दुग्ध व्यवसायाच्या परिस्थिती बद्दल चर्चा केली तसेच गोकुळ दूध संघ कामकाज, दूध संस्था,दूध उत्पादक यांना देण्यात येणा-या दूध दराबाबत,सेवा सुविधा, संकलन यंत्रणा दूध वितरण व, पशुसंवर्धन सुविधा त्याच बरोबर संघाच्यावतिने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाची सविस्तर माहिती चेअरमनसो यांनी यावेळी दिली.या भेटीवेळी गोकुळ सारख्या शेतकरी भिमुख असणाऱ्या संस्थेस निश्चितच विशेष भेट देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे, गोकुळ मुबंई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.