महाराष्ट्र
भिलवडी पंचशीलनगर येथे 13 रोजी “सुर नवा ध्यास नवा” चे उपविजेते शुभम सातपुते यांचा भीम गीतांचा कार्यक्रम
रसिक, नागरिकांनी लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पंचशील नगर येथे पंचशील तरूण मंडळ भिलवडी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा चे उपविजेते शुभम सातपुते यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता येथील पंचशीलनगर येथे आहे या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.