महाराष्ट्र

कामगारांच्या न्याय हक्कासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात, ‘१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी’ एक दिवसीय धरणे आंदोलन : संजय कांबळे

 

*सांगली: बांधकाम कामगार कल्याणकारी मंडाळाचे बंद केलेली वेबसाईट तात्काळ चालू न केल्यास,*
*१५ ऑगस्ट दिनी, बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार : *- संजय भूपाल कांबळे*

*वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या इशारा.*

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तसेच सचिव यांना, मा. सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या मार्फत लेखी निवेदन द्वारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांनी सांगितले आहे की, गेले अनेक दिवस, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची असणारी अधिकृत वेबसाईट (पोर्टल) बंद असल्याने, नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक लाभाचे अर्ज दाखल केले जात नाहीत त्यामुळे अनेक बांधकाम कामगारांचे मुले सदर शैक्षणिक लाभापासून वंचित आहेत तसेच गंभीर आजार असणारे हि काही कामगार तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ अर्ज दाखल केले असता अर्ज भरून घेतले जात नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर काही मयत बांधकाम कामगारांच्या पत्नीला पेंशन तसेच वारसांना इतर आर्थिक मदत घेण्यासाठी अर्ज दाखल केले असता मंडळाचे पोर्टल बंद असल्यामुळे सदर कल्याणकारी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, नोंदीत बांधकाम कामगारांना लाभाचे अर्ज दाखल करण्यासाठी मंडळाचे वेबसाइट ताबडतोब सुरू करावे, तसेच येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होणार आहे. त्यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याचे बंद करावे मात्र बांधकाम कामगारांना मंडळाच्या वेबसाईटवर लाभाचे अर्ज दाखल करण्यासाठी सदरचे वेबसाईट सुरू ठेवावे. आणि आचारसंहिताच्या नावाने वेबसाईट बंद करू नये . बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, मंडळात चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभाराच्या विरोधात तीव्र लढा उभा केला जाणार आहे. तसेच
लवकरात लवकर मंडळाची (पोर्टल) सूरू न केल्यास, आम्हाला आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच त्यांनी निर्माण केलेली, श्रमिक कष्टकरी कामगार कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत बांधकाम कामगारांच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी, ‘१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्वातंत्र्य दिनी’
मा. जिल्हाधिकारी, सांगली, यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण संबंधित अधिकारी व महाराष्ट्र शासन जबाबदार असेल यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पक्षिम महाराष्ट्र महासचिव प्रशांतजी वाघमारे साहेब, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!