क्राईममहाराष्ट्र
पिंपळगाव खु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीस बंदी ; संबंधितांवर कारवाई करण्याचे कागल पोलिसांना निवेदन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- पिंपळगाव खु मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीमध्ये कागल पोलिस स्टेशन मधील जमादार यांनी मिरवणूक काढण्यास बंदी घातली व आपल्याच आई बहिणींना मारहाण केली. शिवीगाळी केली. याबद्दल जमादार यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश गाडेकर साहेब अजित कांबळे साहेब प्रवीण कांबळे साहेब अरविंद कांबळे व समस्त कागल तालुक्यातील सर्व भीम समाज उपस्थित होता.