क्राईममहाराष्ट्र
हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे विजेचा शाॅक लागून शेतकर्याचा मृत्यू

कोल्हापूरःअनिल पाटील
भागाने घेतलेल्या शेतातील ऊस पिकात तणनाशक औषधाची फवारणी करताना विद्यूत पोलवरील विजेची तार पङून शेतकर्याचा जागीच मूत्यू झाला. सूनिल बापू शिंदे वय { 44} रा. नागाव ता. हातकणंगले .जिल्हा. कोल्हापूर असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या नागाव येथील महाजन मळ्यात घङली.
याबाबत अधिक माहीती अशी की” सूनिल शिंदे यांने गावात महाजन मळ्यामध्ये भागाने शेती घेतली आहे.त्यामध्ये त्याने ऊसाचे पिक घेतले आहे. आज सकाळी ते या ऊस पिकात तननाशकाची फवारणी करण्यासाठी गेले होते, औषध फवारणी करत असताना शेतातून विजमंङळाच्या विद्यूत पोलची तार गेली आहे.ती अचानक तूटून त्याच्या अंगावर पङल्याने त्यांचा जागीच मूत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली एम.आय.ङी.सी. पोलिस ठाण्यात झाली आहे.