पलूस तालुक्यातील रामानंदनगरमध्ये जालना जिल्ह्यातील निषेधार्थ कडकडीत बंद : गावातून निषेध फेरी

पलूस प्रतिनिधी …
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाकरिता जे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी जो आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीहल्ला केला . त्याचे तीव्र पडसाद पलूस तालुक्यामधील सर्व गावांमध्ये उमटताना दिसत आहेत. पलूस तालुक्यातील रामानंदनगर गावामध्ये या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. याबाबत चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी गावातून माजी सरपंच जयसिंग नावडकर यांच्या नेतृत्वाखाली फेरी काढण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या आणि पाच सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यावर माता भगिनी यांच्यावर लाठी हल्ला झाला. त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. यासाठी निषेध म्हणून गाव बंद ठेवण्यात आले .तसेच 5 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्रित आले आणि पुन्हा गावातून घोषणा देत प्रमुख मार्गावरून मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळीही मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, जालना येथील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध असो ,छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर, संतोष गायकवाड,माजी उपसरपंच इम्रान पठाण, माजी उपसरपंच प्रशांत नलवडे , अभिजीत उगले ,शिवाजी पाटील ,विलास नलवडे, अनिल मोरे, रमेश देसाई, गणपतराव नावडकर , संतोष तुपे , काका तुपे,महेश गायकवाड,दीपक मदने, संदीप तुपे, राजेंद्र शिंदे, भरत पिसाळ ,दीपक शिंदे ,संजय बिरजे ,दिलीप रकटे ,पप्पू मगदूम, विकास तुपे, विकास पवार, डॉक्टर चंद्रशेखर माने, हंबीरराव मोरे, संतोष गायकवाड, नाथा पाटील, प्रकाश जाधव,रघुनाथ हरणे ,अजित लेंगरेकर, अमित साळुंखे, अशोक साळुंखे, राजेंद्र शिंदे, गजानन कडोले,आदित्य शिताफे,शहाजी मोरे, पप्पू भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी जयसिंग नावडकर, अशोक साळुंखे ,प्रशांत नलवडे ,प्रमोद झेंडे ,इम्रान पठाण ,हंबीरराव मोरे ,रघुनाथ हरणे, शिवाजी पाटील ,संतोष गायकवाड, चंद्रकांत जाधव ,अजित लेगरेकर, चंद्रकांत तुपे, अमीर पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.आणि झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला .