महाराष्ट्रराजकीय

राज्यातील विकासकामे मार्गी लावावीत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक

दर्पण न्यूज  मुंबई :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर्घकालीन नुकसान होतेते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावाअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच पुण्यात एम्सच्या उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातउपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठक झाली. या बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरपरिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेयांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ‘महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वालसार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभागाचे मुख्य अभियंते अतुल चव्हाण उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीवर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकरपुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसातारा जिल्हाधिकारी संतोष पाटीलपिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंगमहानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्माअहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेरत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्यासह पुणे मेट्रोपीएमआरडीएसंबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे संचालन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीपुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम वेगाने मार्गी लावा. पुणे शहरात दर वर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेतत्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रोउड्डाणपूलरिंग रोड तसेच सुरु असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरुर’ रस्त्याच्या कामाची व्यवहार्यता तपासून पाहण्याच्या सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लोणावळा येथील नियोजित स्काय वॉकटायगर पॉईंटपुणे नाशिक ग्रीन फिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे, ‘सारथीसंस्थेच्या नाशिककोल्हापूरनागपूरखारघरछत्रपती संभाजीनगरअमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकामसातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयअलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसातारा सैनिक स्कुलरेवस ते रेड्डी सागरी महामार्गवडाळा येथील जीएसटी भवनरेडिओ क्लब मुंबईरत्नागिरीचे मिरकरवाडा बंदरवढू व तळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकपुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारककृषीभवनकामगार कल्याण भवनसहकार भवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!