जनता शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार सोडणार नाही : डॉ विश्वजीत कदम
कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभेस काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंकाजी गांधी, डॉ विश्वजीत कदम व मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर;
महाराष्ट्र ही साधू-संतांची, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या थोर महापुरुषांची भूमी असून, महाराष्ट्राने देशाला नवा विचार व नवी दिशा दिली आहे. इथली जनता शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार कधीही सोडणार नाही, अशी अशा डॉ विश्वजीत कदम यांनी कोल्हापूर येथील सभेत केली.
डॉ विश्वजीत कदम हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभेस उपस्थित होते. यावेळी भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस मा. प्रियंकाजी गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की,महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, तरुण व सर्व समाजघटकांच्या कल्याणाची गॅरंटी दिली आहे. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जपण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मतदारांनी महायुतीच्या भूलथापांना व फसव्या आश्वासनांना बळी न पडता महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी निवडून द्यावे.या ऐतिहासिक सभेला मा प्रियंकाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाने ही विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळेल. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार, हा विश्वास डॉ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील साहेब, बजरंग पुनिया, खा. चंद्रकांत हंडोरे, मा. मालोजीराजे छत्रपती, संदीप देसाई, संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, अरुण दुधगावकर, संजय पवार, आ. ऋतुराज पाटील, मा. जयंत आसगावकर, मा. राजेश लाटकर, के.पी पाटील, राहुल पाटील, राजू बाबा आवळे, गणपतराव पाटील यांच्यासह काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.