ताज्या घडामोडी

भिलवडी शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत जोरदार खडाजंगी ; संस्थेची अब्रू वेशीवर ?

देणगीच काय करता? शिक्षक भरती कशी करता? यावरून अध्यक्ष, संचालक व सभासदांमध्ये वादंग

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेची रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा  झाली. यामध्ये संस्था अध्यक्ष, संचालक व सभासद यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आणि जोरदार खडाजंगी झाली होती .

सभेमध्ये संस्थेच्या सचिवांना बदलावे अशी मागणी करीत गेली दोन वर्षे झाली सर्वसाधारण सभेमध्ये सचिव बदलाचा प्रस्ताव सभासदांनी आग्रह धरला होता. तरीदेखील संस्था अध्यक्ष व संस्था संचालक यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक सेवक,क्लार्क या पदावरती नेमणूक करत असताना स्थानिक, गावपातळीतील शिक्षण गुणवत्तेप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य द्यावे असा आग्रह ही सभासदांनी धरला. परंतू संस्था अध्यक्ष व संचालकांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या आधीच काही शिक्षकांना नेमणूक देऊन, भरती केलेली आहे हे निदर्शनास येत आहे‌.असे म्हणून सभासद सनी यादव, सचिन पाटील, अमोल चौगुले, रमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन संस्थेचे अध्यक्ष व संस्था संचालकांना धारेवर धरले. याचवेळी एकच गोंधळ निर्माण झाला व सर्व सभासदांनी सभागृहामध्ये गोंधळ करीत, अध्यक्षांना धारेवर धरले. संस्था सचिव मानसिंग हाके यांच्याकडे सभासदांनी अनेक प्रश्न संस्थेकडे लेखी स्वरूपात दिले होते. याचे उत्तर सचिवांनी समाधानकारक न दिल्याने, सभासद वर्ग आक्रमक झाला .व संस्थेमध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळासह अनेक विषय सभासदांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संस्था अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये जवळपास दीडशे शिक्षक सहाय्यक म्हणून पदावरती काम करत आहेत. त्यांच्याकडून आपल्या पगारातील वार्षिक तीन टक्के रक्कम संस्थेकडे घेतली जाते. या पगारातील तीन टक्के रक्कम संस्थेकडे जमा करून, याच रकमेतून संस्थेची देखभाल केली जाते. शिक्षकांच्या पगारावरती तीन टक्के रक्कम घेऊन, संस्थाचालक संस्था चालवित आहेत. हा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. अनेक माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला लाखोंच्या पटीमध्ये देणगी दिलेली आहे. अमृत महोत्सवानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये संस्था स्थापनेपासून आजपर्यंत दहावी बारावी वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या महास्नेहमेळाव्याचेही उत्कृष्ठ असे नियोजन केले.यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये वर्गणी घेऊन, त्या वर्गणीमध्ये स्नेहभोजन भेट वस्तू, सन्मानचिन्ह व फोटोग्राफी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये जवळपास 50 ते 60 लाखापर्यंतची रक्कम शिक्षण संस्थेने जमा केली आहे. अनेक बाबतींमध्ये देणगीच्या स्वरूपात

शिक्षण संस्थेकडे पैशांचा ओघ येत आहे. त्या पैशाचे सर्वसाधारण गणित अद्याप सभासदांना कळले नाही.भरमसाठ पैसा असून सुद्धा सहाय्यक शिक्षक पदावरती विनाअनुदानित जागेवरती काम करत असणाऱ्या शिक्षकांना तुटपूंजा पगारावरती काम करावं लागत आहे.सध्याची महागाई पाहता सात ते आठ हजार रुपये पगारावरती काम करणाऱ्या या शिक्षकांचा पगार वाढवावा अशी मागणीही सभासदांनी केली.यावेळी अनेक प्रश्न या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आले. महिला संचालक पदावरती भरती व्हावी, मागासवर्गीय संचालक संस्थेत घ्यावा , अनेक समाजातील प्रतिनिधी करणाऱ्या व्यक्तींना यामध्ये स्थान मिळावं,
अनेक वर्ष पारंपारिक संचालक त्याच खुर्चीला चिटकून बसलेले आहेत. घरंदाज खुर्चीचा हा संचालक पदाचा डाग केंव्हा पुसणार ? गेले १० ते १५ वर्षे या शिक्षण संस्थेत संचालक पदावरती काम करणारे व्यक्ती आहेत. यांना बाजूला करून, नव्या तरुणांना शिक्षणामध्ये नावलौकिक केलेल्या लोकांना प्राधान्य द्यावं अशी सुद्धा मागणी सर्वसाधारण सभासद व ग्रामस्थ करू लागले आहेत

—————————————

मुलींच्या संरक्षणाबाबतीत अनेक वेळा संस्थेचे सभासद, पालक वर्ग यांनी संबंधित विभाग प्रमुख यांना सूचना करूनही मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण कमी झालेले नाही. तर ते वाढलेलेच आहे. भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा रोड रोमीओंना चाप लावण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक यावरती कोणतीही कठोर पावले उचलत नसल्याने, मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे पालक वर्ग मुलींना शाळेत पाठवावे की नाही या संभ्रमात आहे. परंतु सर्व परिसरामध्ये कृष्णा काठावरती भिलवडी शिक्षण संस्थेची सभा वादळी ठरली याची चर्चा रंगू लागली आहे .

—————————
भिलवडी शिक्षण संस्थेमधील अनेक शिक्षकांचे अनेक राजकीय पक्षाशी लागे-बांधे आहेत. शाळेचे कामकाज सोडून ते राजकारणात दंग असतात तर अनेक शिक्षक हे व्यसनाधीन आहेत. त्यांच्यावरती भिलवडी शिक्षण संस्थेने कोणती कारवाई केली . हा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला असता, अध्यक्ष, संचालक यांनी हा विषय दुर्लक्षित केला. शिक्षकच जर व्यसनाधीन आणि राजकीय समीकरणात अडकले असतील तर विद्यार्थ्यांच्यावर ज्ञानदानाचे काम कसे करणार ? असा गंभीर प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!