सांगली जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करावी : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी शिवजयंती अत्यंत उत्साहात तसेच शांततामय वातावरणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, महाराजांचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. महाराजांच्या विचारांची समृध्द परंपरा व संस्कृती पुढे घेवून जाणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना त्याचे पावित्र्य राखावे तसेच सर्व नियमांचे पालन करून शांततामय वातावरणात साजरी करावी, असे सांगून त्यांनी सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.