महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आधुनिक भारताचा पाया रचला : तहसीलदार रविंद्र रांजणे

तासगावात विविध उपक्रमाद्वारे भीमजयंती साजरी*

 

तासगाव प्रतिनिधी – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन आधुनिक भारताचा पाया रचला असे प्रतिपादन तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. तासगाव येथील भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, दलितमित्र बहुजन नेते भीमरावभाऊ भंडारे, डी वाय एस पी अश्विनी शेंडगे पोलीस उप निरीक्षक झेंडे, माजी नगरसेवक मोहननाना कांबळे, रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्ष संदेश भंडारे, तालुका जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष दिपकबाबा अमृतसागर, युवा नेते रोहन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार रविंद्र रांजणे पुढे म्हणाले डॉ.आंबेडकरांच्या संविधानामुळे गावकुसातला सामान्य माणूस सक्षम झाला असे मत व्यक्त करून डॉ बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत बाबासाहेबांच्या शैक्षणिक व अर्थकारणाचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे असे आवाहन केले.
याप्रसंगी खासदार संजयकाका पाटील म्हणाले डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांची आज जगाला गरज आहे, आधुनिक भारताची पायाभरनी आंबेडकरांनी संविधानाद्वारे केली.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्ताविका वाचन करून करण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष संदेश भंडारे यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहन कांबळे यांनी केले.


यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष विश्वासराव पाटील, ऍड तुकाराम कुंभार, ऍड गजानन खुजट, भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, जाफरभाई मुजावर, रिपाईचे नेते मुन्ना कोकणे, ऍड मोहसीन मुजावर, डॉ आंबेडकर वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत दांडगे, तलाठी पतंगराव माने, बौद्ध महासभा अध्यक्ष महिंदा कांबळे, दिनेश लोखंडे, माजी नगरसेविका नलिनी पवार, युवा नेते अभिजित पाटील, उमेश गावडे, वसंतआबा चव्हाण, जितेंद्र कांबळे अजय कांबळे, समीर कांबळे, प्रसाद वारे, तुकाराम सदाकाळे, राजू काळे, मणेर साहेब, जे के कांबळे, निवास कांबळे, किशोर कांबळे माजी नगरसेवक सी पी कांबळे, राहुल कांबळे, बार्टीच्या समतादूत सविता पाटील, सुरेखा कुंभार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. शेवटी आभार तालुका जयंती समितीचे उपाध्यक्ष दीपकबाबा अमृतसागर यांनी मानले.
.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!