भिलवडी येथे संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने ऐतिहासिक कृष्णा घाटावर 12 रोजी भव्य होड्यांच्या स्पर्धा
भरगच्च आकर्षक बक्षिसे ; दिग्गज मंडळींची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटावर भव्य होड्यांच्या स्पर्धेचे मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ठीक 4 वाजता आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती प्रमुख संयोजक प्रतीक संग्राम पाटील यांनी दिली आहे.
प्रतीक संग्राम पाटील यांनी सांगितले की, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 15000 द्वितीय क्रमांकासाठी 10000 तिसऱ्या क्रमांकासाठी 7000 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5000 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांना भव्य आणि आकर्षक चषकही दिले जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येक सहभागी संघांना मानधन, स्मृतीचिन्ह आणि चांदीची भेटवस्तू दिली जाणार आहे.
संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत असून कृष्णाघाटावर महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
या होड्यांच्या स्पर्धेसाठी माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी ठीक 4 वाजता या स्पर्धा सुरू होणार असून भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि बंधू-भगिनींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी कृष्णा घाटावर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.