बालिंगा गावच्या सरपंचपदी सुधा वाडकर यांची निवड

कोल्हापूरः अनिल पाटील
-बालिंगा (ता. करवीर) येथील सरपंचपदी सुधा रंगराव वाडकर यांची निवड करण्यात आली. पूजा जांभळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अनिल काटकर होते.
सरपंच पूजा जांभळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सरपंच पदाची फेर निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी सुधा वाडकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यामुळे निवड सभेचे अध्यक्ष अनिल काटकर यांनी सुधा वाडकर यांची निवड बिनविरोध जाहीर केली. यावेळी उपसरपंच पंकज कांबळे,सदस्य सचिन माळी, मयूर जांभळे, नंदकुमार जांभळे, संदीप सुतार,पोर्णिमा जत्राटे,राखी भवड,वैशाली कांबळे,सुनिता जांभळे,विद्या माळी,धनंजय ढेंगे उपस्थित होते. यावेळी स्थानिक विकास आघाडीचे मधुकर जांभळे, अनिल पवार अमर जत्राटे, श्रीकांत भवड जनार्दन जांभळे उपस्थित होते. ग्रामसेवक रमेश कारंडे यांनी नूतन सरपंचांचा सत्कार केला यावेळी गावकामगार तलाठी किरण पाटील,युवराज जत्राटे,विजय जांभळे अजय भवड रघुनाथ कांबळे, संतोष जाधव उपस्थित होते.