महाराष्ट्रराजकीय
भाजप -महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांना विजयी करा : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पलूस : नेहमीच भाजप सरकारने देशातील गोरगरीब जनतेची सेवा केली. त्यामुळे भाजप -महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांना विजयी करा , असे आवाहन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पलूस येथे केले.
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप -महायुतीचे उमेदवार संग्राम भाऊ देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूस येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, समृद्ध, संपन्न महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप-महायुती ला प्रचंड बहुमताने विजयी करा.
यावेळी संग्राम देशमुख आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते