महाराष्ट्र
कोल्हापूर येथील लाईन बाजार सेवा रुग्णालयातील अडगळ हटवा : आप पक्षाची मागणी

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूरातील लाईन बाजार येथील सेवा रुग्णालय परिसरात रिकाम्या जागेमधील जुने शेड व खरमातीमुळे सापांची पैदास वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका नागरिकाचा सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला होता.
दवाखान्याच्या परिसरात पडलेल्या अडगळीने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण आहे झाला आहे. याबाबत सेवा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देऊन प्रशिक्षण केंद्राच्या आजूबाजूस पडलेल्या जुन्या सामानाची विल्हेवाट लावून साफसफाई करावी जेणेकरून सापांची पैदास थांबावता येईल अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहर सह-संघटक विजय हेगडे, विभाग प्रमुख समीर लतीफ, विवेक भालेराव, रमेश कोळी, सर्पमित्र संग्राम जाधव आदी उपस्थित होते.