महाराष्ट्र

शेलगाव ( दि ) येथे आरंभ पालक मेळावा उत्साहात  

 

 

दर्पण न्यूज प्रतिनिधी ( संतोष खुने):- कळंब : – दि. २३ फेब्रू २०२५ कळंब तालुक्यातील येरमाळा अंतर्गत शेलगाव दिवानी अंगणवाडी क्रमांक 91 59 16 येथे आरंभ पालक मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चनाताई गाढवे तर प्रमुख पाहुणे म्हणून येरमाळा विभागाच्या पर्यवेक्षिका अनुपमा बोरफळकर ग्रामसेवक ओमप्रकाश नागटिळक बालाजी गाढवे उपसरपंच रणजीत दिवाने दत्तात्रेय चंदनशिवे यांची उपस्थिती होती . याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले .याप्रसंगी या कार्यक्रमांमध्ये बाळ गर्भामध्ये राहिल्यापासून ते बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत मेंदूचा विकास 80% होतो आणि त्या

कालावधीत माता आणि बालकाला पोषण वातावरण कुटुंबाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . बालक माता यांच्यासाठी घरातील वातावरण आनंदी राहावे आणि बाळाच्या उज्वल भविष्यासाठी मातांचे विचार सकारात्मक ठेवून लहान बाळावरती गर्भ मंगल संस्कार करावेत . या वेळी बाळाचा आहार व मातेच्या आहारावर विशेष करून महत्त्वाची माहिती देण्यात आली . याप्रसंगी बालकांनी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबतचे फलक याबद्दल पूरक माहिती देण्यासाठी वेगवेगळे 32 प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअंगणवाडी कार्यकर्त्यां सौ . सुशीला दत्तात्रय चंदनशिवे , श्रीमती प्रभावती दिवाने पाटील, सौ सीमा अनिल चंदनशिवे सौ सुरेखा पवार यांनी परिश्रम घेतले .यावेळी बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध प्रकारच्या रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या . यावेळी कार्यक्रमांमध्ये अंगणवाडीतील बालके खूप आनंद घेत होती . या मेळ्याचा मुख्य उद्देश पालकांनी मुलाच्या हातात मोबाईल न देता खेळणी पण नको पण खेळ हवा असा संदेश देण्यात आला .याप्रसंगी सर्व लहान मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले .चौकशीला चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!