महिलांचा विकास करणार ; प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून द्या : उद्योजिका भाजपच्या उमेदवार तृप्ती कांबळे

दर्पण न्यूज मिरज/ सांगली (अभिजीत रांजणे) :- सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 मधून मी निवडणुकीस उभा राहिले आहे. मी उद्योजिका असल्याने या प्रभागातील महिलांचा विकास करणार असून प्रभाग क्रमांक 20 मधून मला निवडून द्या , असे आवाहन उद्योजिका भाजपच्या उमेदवार तृप्ती कांबळे यांनी केले आहे.
उद्योजिका भाजपच्या उमेदवार तृप्ती कांबळे यांनी सांगितले की, मी प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणुकीस उभा आहे. मी महिलांसाठी गारमेंट उभा करून शेकडो महिलांना उद्योग दिला आहे. बँकेच्या माध्यमातून आम्ही महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले आहे. अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. येणाऱ्या काळात मला प्रभाग क्रमांक 20 चा सर्वांगिण विकास करणार आहे. अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ जानेवारीला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करावे, असे आवाहन भाजपच्या उमेदवार तृप्ती कांबळे यांनी केले.



