राजर्षी शाहू महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसावेत : उद्योगपती सी. आर. सांगलीकर

सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार येणाऱ्या पिढीने आत्मसात करावेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक, उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी केले.
इस्लामपूर येथे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त येथील सी.आर. सांगलीकर फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार होते. यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रंगराव बनसोडे यांचा ‘राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.सुनिता बोर्डे-खडसे यांचे ‘राजर्षी शाहू यांचे शैक्षणिक कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद कांबळे, प्रतापराव मधाळे, एम.के. कांबळे, अरविंद कांबळे यांची प्रमुख
उपस्थिती होती. सी.आर. सांगलीकर फाऊंडेशनचे अमोल कांबळे, किरण पाटील, सचिन इनामदार, दिनकर बोकणे, जितेंद्र पवार, चंद्रकांत पवार, किशोर जाधव यांनी कार्यकमाचे संयोजन केले. शाहू जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सुनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.मिलिंद खंडेलोटे यांनी आभार मानले.