महाराष्ट्र
आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या पाठीशी उभे राहणार : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
भिलवडी, औंदूबर येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे जोरदार स्वागत

भिलवड : माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने सांगली जिल्हा पलूस तालुका भिलवडी, औदुंबर येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. औदुंबर येथे चव्हाण यांनी श्री क्षेत्र औदुंबर दत्त दर्शन घेतले.
यावेळी अशोकराव चव्हाण यांनी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणी जाग्या केल्या. भिलवडी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांनी अशोकराव चव्हाण यांचे स्वागत केले.
भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी औदुंबर, भिलवडी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते