महाराष्ट्र

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मार्च पास संचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी संस्थेच्या विविध विभागातील सर्व यशस्वी व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींचा सत्कार अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच महसूल विभागाचे वतीने भिलवडी गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

प्लास्टिक निर्मूलन अंतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. ७५०० इतक्या पिशव्यांचे संकलन करण्यात आल्याचे विभाग प्रमुख उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी सांगितले.उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी कापडी नॅपकिन बुके तयार केले होते. याप्रसंगी आजचा दिवस हा देशासाठी बलिदान दिलेल्या थोर क्रांतिकारी व सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणाचा दिवस, त्यांच्या त्यागातूनच, बलिदानातूनच आजचे हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत. सर्व भारतीय नागरिकांनी सुदृढ नागरिक म्हणून देशाच्या विकासात सहकार्य करावे व देशाची अर्थव्यवस्था मजबूत व सुदृढ बनवण्याच्या कामी सहकार्य करावे असा संदेश विश्वास चितळे यांनी दिला. तसेच आजच्या या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वनस्पतीय शास्त्रीय उद्यानाचे उद्घाटन व औषधी वनस्पती वृक्षारोपण माजी संचालक, मुख्याध्यापक बी. एन. मगदूम, संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे व उपस्थित संचालकांच्या हस्ते करण्यात आले.शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. महावीर चोपडे व ढालाईत कुटुंबियांच्या वतीने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देणगी देण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक सुनिल वाळवेकर ,संजय कदम, व्यंकोजी जाधव,जयंत केळकर, सचिव मानसिंग हाके, सहसचिव के.डी .पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक देशपांडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका विद्या टोणपे, सेमी इंग्रजी मुख्याध्यापक तुषार पवार, स्मिता माने सर्व विभागातील शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!