सांगली येथील कवठेमहांकाळ येथे आयोजित, स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांच्या मल्टिमिडीया प्रदर्शनाची सांगता
केंद्रीय संचार ब्यूरो कोल्हापूर कार्यालयाने रांजणी येथे साजरे केले “मेरी माटी मेरा देश” अभियान

सांगली :-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालय यांच्या वतीने कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाची आज सांगता झाली.
या निमित्ताने कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी गावामध्ये तसेच कवठे महांकाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शाहीर प्रकाश लोहार यांच्या लोककला कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ यांनी शाहिरी पोवाडा, लोकगीते सादर केली.
स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वपूर्ण घटना आणि भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी यासंदर्भात हे प्रदर्शन होते. सदर प्रदर्शनामध्ये 1857 ते 1947 पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांविषयीची दुर्मिळ छायाचित्रे व माहिती प्रदर्शित केली गेली. VR गॉगल्स सारख्या डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मिळ दृश्ये या प्रदर्शनात दाखवली गेली आणि त्याला आबालवृद्धांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
दिनांक 14 ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये कवठेमहांकाळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात हे प्रदर्शन आयोजित केले गेले.
भारतीय स्वातंत्र्यालढ्याबद्दल सामान्य नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
त्याचबरोबर ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये रांजणी गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिलाफलकाचे उद्घाटन, वृक्षारोपण, झेंडावंदन तसेज माती हातात घेऊन सेल्फी काढण्याचे कार्यक्रम अंतर्भूत होते.