पलूस तालुक्यात पेटी उघडा गुणवत्ता वाढवा उपक्रम राबवण्यात आला 84 जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवला : गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी

पलूस :पलूस तालुक्यामधील जिल्हा परिषद परिषदेच्या सर्व 84 शाळांमधून पेटी उघडा गुणवत्ता वाढवा हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली ते म्हणाले की शासनाने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास वाढीकरिता भाषा ,विज्ञान या विषयाकरिता ज्या माहितीच्या अभ्यासक्रमाच्या पेट्या विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना उपयोगी आहे. आज पेटी उघडा गुणवत्ता वाढवा हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्हा परिषद म्हणून आलेले निरीक्षक, त्याचबरोबर आमचे शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख यांनी यशस्वीरित्या हा उपक्रम संपन्न केला .सर्व शाळांमध्ये ही अभियान यशस्वी रित्या राबवले गेले अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली .
जिल्हा समन्वयक अंजना निकम यांनी नागराळे येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली .यावेळी पेटी उघडा गुणवत्ता वाढवा या अंतर्गत गणित, विज्ञान या भाषेची माहिती असणारी पेटी उघडून गुणवत्ता वाढीसाठी किती उपयोग होतो या संदर्भात माहिती दिली . विना दप्तराची शाळा असताना पेटी उघडा गुणवत्ता वाढवा या उपक्रमाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाला असे सोनाली चव्हाण म्हणाल्या. यावेळी जिल्हा समन्वयक अंजना निकम यांचा सत्कार वैशाली चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.