दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- मानवी जीवन भक्ती आणि प्रेमाशिवाय व्यर्थ आहे. शिक्षणाने साक्षर झालेल्या माणसाला शहाणपण प्राप्त होण्यासाठी ग्रंथांशी मैत्री केल्याशिवाय पर्याय नाही.संतानी निर्माण केलेली साहित्य संपदा ही आदर्श मानवी जीवनाचा वस्तुपाठ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक माधव जोशी यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कै.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित आयोजित कार्यक्रमात ‘ग्रंथांच्या सांगाती ‘ या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाधीस्थळाचे दर्शन घेण्यात आले.
यापुढे बोलताना माधव जोशी म्हणाले की, डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी शिक्षण व आरोग्य सेवेच्या माध्यमातून निर्माण केलेले कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे आहे.त्यांनी निर्माण केलेल्या आदर्श पायवाटेवरून आपण चालत राहणे व सर्व समान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हीच खरी आदरांजली ठरेल.
भिलवडी शिक्षण संस्थेस आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून एक लाख रुपयाची देणगी दिल्याबद्दल डॉ.रविंद्र वाळवेकर यांचा संस्थेच्या वतीने विश्वास चितळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.पाहुणे परिचय सहसचिव के.डी.पाटील यांनी केला. अश्विनी बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.महेश पाटील यांनी आभार मानले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले,डॉ.सुहास जोशी,संचालक महावीर वठारे, डॉ.रविंद्र वाळवेकर,संभाजी सूर्यवंशी,अजय चौगुले,मुकुंद जोग,प्रा.धनंजय पाटील,सदाशिव तावदर, जे. बी.चौगुले, भू.ना.मगदूम, सुनिता चितळे,अनघा चितळे,अशोक साठे,रोहित नलवडे,मुख्याध्यापक संजय मोरे,प्राचार्य सुरेश शिंदे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी,शंकर बल्लाळ आदींसह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
