
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -: आदर्श इन्स्टिट्यूट च्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आयआयटी बॉम्बे स्पोकन ट्युटोरियल उपक्रमाला उल्लेखनीय यश मिळाले असून, एकूण १,४३१ विद्यार्थ्यांनी स्पोकन ट्युटोरियल अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
या यशस्वी उपक्रमासाठी सौ. विद्या कदम, ट्रेनिंग मॅनेजर, स्पोकन ट्युटोरियल, एज्यु पिरॅमिड्स, आयआयटी बॉम्बे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन स्किल अॅक्सिलरेटर लॅब उपलब्ध करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. याबद्दल त्यांचे विशेष आभार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या सुस्त उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक अँड सदाशिवराव भाऊ पाटील व संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. श्री. वैभव पाटील यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले यावेळी कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील आर्थिक संचालक श्री. रविराज सूर्यवंशी, कॅम्पस संचालिक कु. पूजा पाटील तसेच प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
तसेच आयक्यूएसी प्रमुख डॉ.ए आर निचळ आणि डिप्लोमा डीन प्रा. ए. बी. साळुंखे कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ व्ही बी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अजितसिंह चव्हाण, सर्व डीन, सर्व विभागप्रमुख, यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान दिले
स्पोकन ट्युटोरियलचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा डी. के जाधव व सर्व समन्वयकांनी अत्यंत मेहनतीने व नियोजनबद्ध परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करून हा उपक्रम यशस्वी केला. त्याबद्दल संपूर्ण टीमचे संचालिका पुजा पाटील यांनी कौतुक करून अशाच नवनवीन संकल्पना आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक व कौशल्यविकासासाठी, डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उद्योगाभिमुख ज्ञान प्रदान करण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल अशी खात्री व्यक्त केली या १,४३१ विद्यार्थ्यांचे यश हे आदर्शच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि कौशल्य विकासासाठीच्या बांधिलकीची पोहोच पावती आहे असे मत प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक यांचे अभिनंदन करण्यात आले.