दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुने) :-
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-चेन झोंबाडे, सोन्या बारकुल, आर्यन कात्रे, अमर पवार, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.02.06.2026 रोजी 15.00 वा. सु. येरमाळा येथे देवीच्या पार्कींग मध्ये फिर्यादी नामे-रुपाली परमेश्वर केरुळकर, वय 32 वर्षे, यांना व त्यांचे पती परमेश्वर केरुळकर व भाउ अमोल रेडे यांना नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रुपाली केरुळकर यांनी दि.03.06.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.