समता सायकल रॅलीचे भिलवडी येथे जल्लोषात स्वागत

दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी -: राष्ट्र सेवादल सांगली जिल्हा
यांनी आयोजित केलेल्या समता सायकल रॅलीचे आज भिलवडी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले .जिल्हा प्रमुख सदाशिव मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या रॅलीमध्ये 40 सेवा दलाचे स्वयंसेवक सहभागी झालेले होते प्रारंभी दक्षिण भाग सोसायटीजवळ रॅलीचे आणि प्रबोधन पर रथाचे हार्दिक स्वागत करण्यात आले यावेळी सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे कार्यवाह सुभाष कवडे भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे, सुबोध वाळवेकर संभाजी महिंद व्यापारी एकता असोसिएशनचे दीपक पाटील मंगलदीप मेडिकलचे नावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भारत माता की जय हम सब भाई भाई वंदे मातरम साने गुरुजी अमर रहे अशा विविध घोषणांच्या साथीत सायकल रॅली सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे दाखल झाली या ठिकाणी रॅलीतील संयोजकांना ग्रंथ भेट देऊन वाचनालयाचे वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही सामुदायिक प्रार्थना झाली सदाशिव मगदूम आणि सुभाष कवडे यांनी मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीची आज देशाला गरज असल्याचे सुभाष कवडे यांनी आवर्जून सांगितले यानंतर स्नेहभोजन झाले आणि ही रॅली औदुंबरकडे रवाना झाली . रॅलीचे संयोजन साने गुरुजी संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे सर यांनी केले. वाचनालयाच्या ग्रंथपाल मयुरी नलवडे लेखनिक विद्या निकम माधव काटिकर प्रथमेश वावरे यांचेही संयोजना कामी सहकार्य लाभले.


