सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी
यांचे वतीने डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख एचडी प्राध्यापक एसडी कदम पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विद्यार्थी चितळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कवी संमेलन संपन्न झाले प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविका डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला यावेळी झालेल्या कवी संमेलनात हेमा सुपणेकर ऋतुजा जाधव अवंतिका स्वामी श्वेता रांजणे श्रुती वाकुडे अनुराधा वावरे,ज्योती कांबळे या विद्यार्थिनीसह वाचक प्रथमेश वावरे शिक्षक रमेश चोपडे सर यांनी कविता सादर केल्या तसेच सौ स्नेहा शेडबाळकर वायदंडे सर ग्रंथपाल मयुरी नलवडे लेखनिक विद्यानिकम यांच्यासह अनेक वाचकांनी अब्दुल कलाम यांच्या आत्मकथनातील निवडक भागांचे वाचन केले वाचनालयाचे वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.संयोजन मयुरी नलवडे विद्या निकम माधव काटीकर यांनी केले.सूत्रसंचालन कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.यावेळी विश्वस्त जी.जी.पाटील संचालक जयंत केळकर वाचक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


