कृषी व व्यापारदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
फळपीक विमा उतरविण्यासाठी 6 जुलैपर्यंत मुदतवाढ

दर्पण न्यूज सांगली : फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या चार पिकांसाठी विमा उतरविण्याची मुदत 30 जून 2025 होती. ही मुदत दिनांक 6 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पोर्टलवर विमा नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.