धावपळीच्या युगात प्रत्येकाने वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ.सोनल भालेराव
रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता या विषयावर व्याख्यानात

दर्पण न्यूज टाकळीभान: आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ . सोनल भालेराव यांनी केले .रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरुकुल प्रकल्पांतर्गत वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना डॉ सोनल भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे, चांगला संतुलित आहार घेतला पाहिजे . व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे . आरोग्याविषयी येणाऱ्या समस्या आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगितल्या पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले .यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.एस . जरे , गुरुकुल विभागप्रमुख श्रीमती एन . ए . पालवे , संदिप जावळे ,श्रीमती एस. बी . नलवडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही .आर .जमदाडे यांनी तर आभार एस . पी .कोकाटे यांनी व्यक्त केले .