आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त :  जिल्हाधिकारी अशोक काकडे

मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

       दर्पण न्यूज सांगली : वैद्यकीय क्षेत्र हे आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अचानकपणे उद्‌भवणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन सज्ज असणे आवश्यक असते. या अनुषंगाने अचानक उद्‌भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापन व रूग्णालयात कार्यरत अधिकारीकर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण उपयुक्त ठरेलअसा विश्वास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे व्यक्त केला.

        

मेहता हॉस्पिटल येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय रूग्णालयमिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरवजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदममहानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटीलअतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरेडॉ. अजित मेहताडॉ. पराग शहाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफअग्निशमन अधिकारी सुनील माळीडॉ. संजय पाटीलडॉ. अनिरुध्द पाटील आदि उपस्थित होते         जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणालेनागरिकांच्यारूग्णांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. अचानक उद्‌भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावेकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यातयाची मानसिकता तयार होण्यासाठी अशी प्रशिक्षणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालये व अन्य खाजगी रूग्णालयात हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सोदाहरण सांगितले.

 

        जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमहानगरपालिकेचा अग्निशमन व आपत्कालिन सेवा विभाग आणि मेहता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉस्पिटल सेफ्टी प्लॅनअंतर्गत मेहता हॉस्पिटल येथे या उपक्रमाचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी हॉस्पिटल सेफ्टी प्लॅन तयार करण्याबाबतची माहिती प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर चे डॉ. संजय पाटील यांनी व रूग्णालयात आगीबाबत दुर्घटना घडू नये यासाठी आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने                  अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी मेहता हॉस्पिटलमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निशमन उपकरण वापरण्याचे प्रशिक्षण  दिले.

       

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!