डॉ. पतंगराव कदम महाराष्ट्राचे भाग्यविधाते : पत्रकार दीपक पवार
रयत शिक्षण संस्थेचे,डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) येथे स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांची 81 वी जयंती साजरी

रामानंदनगर : डॉ. पतंगराव कदम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भाग्यविधाते होते , असे प्रतिपादन पत्रकार दीपक पवार यांनी केले.
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे,डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) मध्ये स्वर्गीय आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते पत्रकार दीपक पवार बोलत होते.दरम्यान,महाविद्यालयांमध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे व वक्ते पत्रकार दीपक पवार यांनी सांगितले की
डॉ. पतंगराव कदम हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भाग्यविधाते होते.कंत्राटी कामगारांचा प्रश्न असो, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न असो, मध्यान शालेय पोषण आहाराचा प्रश्न असो त्यांनी आपल्या परखड कर्तुत्वाने सोडवला आहे. कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य.डॉ यु. व्ही.पाटील यांनी भूषवले. पर्यवेक्षक प्रा. एस. एस. खोत उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शितल पाटील यांनी केले. आभार प्रा. शैलेश कांबळे व सूत्र संचालन प्रा.सरिता निकम ,प्रा. राजेश पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते