महाराष्ट्र
भिलवडी येथे स्व उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या जयंतीनिमित्त 10 रोजी भव्य रक्तदान शिबीर

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती स्व.काकासाहेब चितळे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 10 रोजी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती उद्योजक गिरीश चितळे यांनी दिली. जानकीबाई चितळे सभागृह पाटील गल्लीत सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे. जायंट्स ग्रुप व सहेली यांनी संयोजन केले आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी रक्तदान करण्याचे आवाहन जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष महावीर चौगुले व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील चितळे एक्सप्रेससमोर जायंट्स ग्रुप भिलवडी व चितळे उद्योग समुहातर्फे पाणपोईचे उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी चितळे डेअरी कॅम्पस भिलवडी स्टेशन येथे शास्त्रीय ते सुगम संगीत मैफल कार्यक्रम होणार आहे.