महाराष्ट्र

भिलवडी येथे जायंट्स ग्रुप भिलवडीतर्फे गुणवंतांचा सत्कार : उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

 

भिलवडी :
जायंट्स ग्रुपच्या मासिक सभेत शालेय विद्यार्थी तसेच सहकारी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार चितळे उद्योग समुहाचे उद्योगपती व एनसीएफ मेंबर गिरीश चितळे यांच्याहस्ते करण्यात आला.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकणारी कु. श्रुती शशिकांत पाटील हिची राज्यस्तरीय शालेय सिकाई मार्शल आर्ट खेळामधे सुवर्णपदक व राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल त्याचप्रमाणे कु. सानवी राजेंद्र कोळी हिची राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉलच्या महाराष्ट्र संघातुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली या मुलींचा सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब चोपडे पतसंस्था संचालकपदी निवड झाल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे सदस्य शशिकांत चौगुले व संभाजी महिंद यांचा सत्कार करण्यात आला. जायंट्स ग्रुपचे कार्यवाह निवास गुरव यांना ज्ञानक्रांती सामाजिक सेवाभावी संस्था मंगळवेढा यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, उपाध्यक्ष महावीर चौगुले, बाळासो महिंद, खजिनदार विशाल सावळवाडे, डॉ. जयकुमार चोपडे, डी.आर.कदम यांच्यासह जायंट्स ग्रुपचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!