महाराष्ट्र

मिरज येथे “शुद्ध बीजापोटी”ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

 

मिरज :- बाल गंधर्व नाट्यगृह मिरज येथे सुरू असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उद्योगपती मा.सी.आर. सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अॕँड मिडीया प्रा.लि.या संस्थेने सादर केलेल्या “शुद्ध बीजापोटी” या नाटकाला नाट्य रसीकांचा उत्प्रस्फूर्त तिसाद मिळाला.

या प्रयोगाचे उद्घाटन निर्माते उद्योगपती मा.सी.आर.सांगलीकर यांच्या हस्ते बुद्ध पूजा करून झाले. नाटकाचे लेखक प्रेमानंद गज्वी तर दिग्दर्शन नंदकुमार कुरुंदवाडकर यांनी केले आहे.
या नाटकाचा विषय वेगळा असून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्य प्रणालीवर प्रकाशझोत टाकणारा आहे.आर्यवंशिय ब्राह्मण मुलगी आणि दलित मुलगा यांच्या प्रेमाविवाहास ब्राह्मण पिता बाळ पेशवे यांचा विरोध दर्शविला आहे.सामाजिक,प्रबोधनाचा संदेश देणारे नाटक आहे.हि स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येते.
‘शुध्द बीजापोटी ‘या नाटकाने जाती विषमतेच्या बेड्या तोडून माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारावे यातच मानवाचे कल्याण आहे.हा विचार नाटकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा सार्थ प्रयत्न केला आहे.यातील सर्वंच कलाकारांनी अतिशय सुंदर कामे केली आहेत.नाटक चांगलं होण्यासाठी त्यांनी चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले.यातील प्रा.बाळ पेशवेची भूमिका करणारे नंदकुमार कुरुंदवाडकर, वेदीकेची भूमिका करणारी रोहीणी लोंढे,संबुध्द आणि सुकळ्याची भूमिका करणारे दिपक गोठणेकर यांनी त्यांच्या अनुभवानुसार उत्कृष्ट अभिनय करत आपापल्या भूमिकांना चांगलाच न्याय दिला आहे. जाईची भूमिका करणार्या शैलजा साबळे या नवख्या असूनही कसलेल्या अभिनेत्री सारखा दमदार अभिनय करून नाट्य रसिकांची वाहवा मिळवली.तसेच फौंडेशनचे कर्मचारी अविनाश जाधव हेही नवखे असूनही त्यांनी साकारलेला भावे भटजी टाळ्या घेत भाव खाऊन गेला.सम्यक व सनातनची भूमिका साकारनारे आकाश शिंदे आणि हर्षवर्धन काळे यांनीही उत्तम अभिनय करत रसिकांची मने जिंकली.गाथा व लेले यांच्या भूमिका साकारलेले वनिता कोरे व विश्वास मागाडे यांनीही चांगला अभिनय केला.सर्व कलाकारांनी नाट्य रसीकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते.
नाटकाचे नेपथ्य कासिम मुलाणी, प्रकाश सुरज कांबळे, संगीत योगेश साबळे, रंगभूषा प्रियांका कांबळे, वेशभूषा चेतना नागवंशी, दिपाली कांबळे, निर्मिती व्यवस्थापण विश्वास मागाडे, सूत्रधार दिपक गोठणेकर हे होते.रंगमंच व्यवस्था सिध्दांत बोकणे, सिध्दार्थ पवार,दिक्षा पवार शिवम् कुरूंदकर,यांनी केली.
विशेष सहकार्य अॕड.संजिव साबळे, सचिन इनामदार, प्रदिप कांबळे,रविंद्र खांडेकर,विजय लांडगे,पवन वाघमारे, रुपाली बनसोडे,मनिषा जमने यांचे मिळाले…
नाटकाला सांगली,मिरजेसह तालुक्यातील सातशेच्यावर नाट्य रसीक उपस्थित होते.रसिकांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!