महाराष्ट्र

सेवानिवृत्त किर्लोस्कर कामगार राजमाने यांनी केले मरणोत्तर देहदान

शिवाजी राजमाने हे नावाप्रमाणे जगले

 

पलूस :- किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड मध्ये कामानिमित्त आलेल्या मूळच्या असणाऱ्या कसबे डिग्रज या गावांमधून जवळपास 1966 मध्ये आलेले शिवाजी सदाशिव राजमाने यांनी आपल्या मरणोत्तर देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या मृत्यूनंतर मेडिकल च्या विद्यार्थ्यांना माझ्या शरीराचा उपयोग होऊ दे. ही भावना त्यांची होती. रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या सावंत पूर वसाहत तालुका पलूस येथील राहत्या घरी संध्याकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी, चार मुली, जावई यांनी शासकीय महाविद्यालय मिरज येथे संपर्क केला. घरच्या मंडळीं नी शिवाजी राजमाने यांचे शव ॲम्बुलन्स ने मिरज मेडिकल कॉलेज ला नेऊन त्यांच्या इच्छेनुसार देहदान केले. हयात असतानाच शिवाजी राजमाने यांनी देहदाना संबंधी, त्यांनी कुटुंबातील सर्वांची परवानगी घेतली होती .ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कारखान्यांमध्ये जवळपास 35 वर्ष कामगार म्हणून त्यांनी सेवा केली.त्यांचे केस हे जवळपास दीड फुट लांब होते. त्यांचा स्वभाव हा बोलका होता. करारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. जे मना त ठरवायचे तेच ते करायचे. किर्लोस्कर कंपनीत त्यांनी मशीन टूल डिव्हिजन या विभागात जवळपास 35 वर्षे सेवा केली .वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ते किर्लोस्कर कंपनीत अप्रेंटिस म्हणून सेवेत रुजू झाले होते. त्यांना त्यांच्या पक्षात, पत्नी चार मुली, चार जावई ,नातवंडे असा परिवार आहे .देहदान केल्याने त्यांचे सर्व विधी सोमवार दिनांक 21 रोजी त्यांच्या सावंतपूर येथील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी कसबे डिग्रज मांजर्डे, पन्हाळा, कोल्हापूर, पुणे येथील त्यांचे जावई व पाहुणे मित्रमंडळी उपस्थित होते. त्यांना त्यांच्या पोटी चार मुली जरी असल्या तरी, त्यांनी चारही मुलींना उच्च शिक्षण दिले. आपल्या पायावर उभा केले. त्यानंतर त्याचा विवाह केला. शिवाजी राजमाने, हे अतिशय प्रामाणिक, कष्टाळू होते. त्यांनी किर्लोस्कर कंपनीची मनोभावे सेवा केली.
जगदीश शेटे मांजर्डे, सतीश महालिंग कोरे,पन्हाळा. अभय यशवंत पाटील ,पुणे. सत्यजित विजय दैने, कोल्हापूर. हे सर्व जावई तसेच त्यांचे कसबे डिग्रज येथील बंधू,महावीर सदाशिव राजमाने, आणि पुतणे अमोल शिवलिंग राजमाने, यांच्यासह सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यावेळी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!