महाराष्ट्र

राधानगरी तालुक्याने दूध वाढीचा उच्चांक करावा तरच जिल्ह्यात दूग्ध उत्पादनात क्रांती होईल : गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे आवाहन

 

कोल्हापूरः अनिल पाटील

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची राधानगरी तालुक्याला दोन वेळा संधी मिळाली. अध्यक्षांचा तालुका म्हणून आता राधानगरी तालुक्यातून दूध वाढीचा उच्चांक करावा तरच जिल्ह्यात दुग्ध उत्पादनात क्रांती होईल असे आवाहन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.
नरतवडे (ता राधानगरी )येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या राधानगरी तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
डोंगळे पुढे म्हणाले, दूध उत्पादकांचे हित डोळ्यासमोर समोर ठेऊन संघाचा कारभार सुरू आहे. संघामार्फत अनेक सेवा सुविधा पुरवल्या जात असून त्याचा लाभ घेवून दूध उत्पादन वाढवले पाहिजे. दूध उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी संपर्क सभांचे आयोजन करण्यात आले असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.
संचालक अभिजित तायशेटे यांनी स्वागत केले. संचालक किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विश्वास पाटील, संभाजी देसाई, नामदेव पाटील यांच्यासह अनेक संस्था प्रतिनिधींनी आपल्या समस्या व्यक्त केल्या. याप्रसंगी अरुण डोंगळे यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर दहा वेळा संघाचा ‘गोकुळश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल शांताराम आनंदा साठे (सरवडे) यांचा अध्यक्ष डोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गोकुळच्या पशुवैद्यकीय अधिकारी मारहाण प्रकरणात कर्मचारी संघटनेने आक्रमक आंदोलन केल्यानंतर सामंजस्याने तोडगा काढल्याबद्दल संचालक रणजीत पाटील, दूध संकलन अधिकारी आशिष पाटील, युनियन प्रतिनिधी सुहास डोंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामकाजाबद्दल महिला विकास अधिकारी नीता कामत राधानगरी तालुक्यातील काही आदर्श सुपरवायझरांचेही सत्कार करण्यात आले.

मेळाव्यात विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली.
सभेस संचालक विश्वासराव पाटील . कार्यकारी संचालक योगेश गोडबोले. गोकूळचे सर्व संचालक. व सर्व दूध संस्था पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!