भ्रष्टाचारमहाराष्ट्र

किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट कंपनीने कोट्यवधी रुपये बुडवले : किर्लोस्करवाडी कंपनी समोर आरपीआयचे कामगार कुटुंबियांसोबत साखळी उपोषण

 

 

दर्पण न्यूज रामानंदनगर :- किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड किर्लोस्करवाडी,येथे काम करत असणाऱ्या कामगारांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रॅज्युटी फंडाची रक्कम ही किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट कंपनी यांच्या कंपनीमध्ये गुंतवली होती. दाम दुप्पट अथवा गुंतवणूक म्हणून त्यांनी ती रक्कम किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवली होती. परंतु ती कंपनी गेली कित्येक वर्षे अस्तित्वातच नसून जवळपास 1990 पासून च्या लोकांच्या रकमा या अडकून पडलेल्या आहेत. त्यांना त्यांचा परतावा मिळालेला नाही.अंदाजे कोट्यावधी रुपये यामध्ये लोकांनी गुंतवलेले आहेत. अनेक गुंतवणूक दार कामगार हे मृत्युमुखी पावलेले आहेत.त्यांच्या कुटुंबीयांनी आज कुंडल मार्गावरील असणाऱ्या किर्लोस्कर कंपनीच्या गेट समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे या वेळेला काळीबाग म्हणाले किर्लोस्कर कंपनीने आमच्याशी जो पत्र व्यवहार केलेला आहे. त्यात आमच्या संघटनेची किर्लोस्कर कंपनीने बदनामी केलेली आहे त्यामुळे आम्ही किलोस्कर कंपनीचा निषेध करतो आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहे. किर्लोस्कर कंपनीला पैसे द्यायला भाग पाडू असेही ते म्हणाले. यावेळी आंदोलनात आर पी आय तालुका अध्यक्ष अविनाश काळेबाग , अमरजीत कांबळे कार्याध्यक्ष आरपीआय, यश ऐवळे युवक तालुका उपाध्यक्ष, रवी संनके राष्ट्रीय चर्मकार संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, बाबासाहेब जाधव, दलितमित्र भगवान जाधव,  कांता गोविंद कांबळे, सुशीला आनंदा कुंभार,शिवाजी आरबूने, विजयकुमार गोपालकर, धोंडीराम मदने, प्रभाकर कोरे, योगेश कांबळे,दिनकर लेंगरेकर, रवींद्र जाधव, शालन जाधव,परशुराम मोकळे आदींचा सहभाग होता. यावेळी किर्लोस्कर कंपनी तर्फे आंदोलन आरपीआय ला देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ग्रॅज्युटी फंडा ची रक्कम कंपनीचे कामगार आणि व्यवस्थापन यांच्या संदर्भातला विषय असून त्रयस्थानी यामध्ये भाग घेणे उचित नाही.हे सुरू असलेले तुमचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचेही कंपनीकडून पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. हा वाद मुद्दा अस्तित्वात नसल्याचेही कंपनीच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले की आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. एकंदरीत किर्लोस्कर कंपनीच्या विरोधात आर पी आय ने सूरु केलेले आंदोलन आता उग्ररूप घेईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!