कृषी व व्यापारमहाराष्ट्रसामाजिक

JPrime Buildcon ची भव्य बिझनेस मीट ‘Sankalp 2025’ – मुंबई 3.0 च्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात

 

दर्पण न्यूज मुंबई   :— JPrime Buildcon, परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या ब्रँड्सपैकी एक, यांनी नुकतीच त्यांची भव्य बिझनेस मीट ‘Sankalp 2025’ आयोजित केली. या कार्यक्रमात 200 हून अधिक टॉप चॅनल पार्टनर्स आणि नवी मुंबईतील मान्यवर पाहुण्यांनी सहभाग घेतला. भागीदारी, एकत्रित दृष्टीकोन आणि नव्या मुंबईच्या विकासात सामूहिक योगदान या हेतूने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले माननीय दिलीप औटी सरांचे स्फूर्तिदायक आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शन. आंतरराष्ट्रीय बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आणि कोच म्हणून त्यांचा अनुभव आणि MSME, प्रोफेशनल्स व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले विचार JPrime च्या ‘People First’ दृष्टिकोनाशी सुसंगत होते.

कार्यक्रमाला मराठी चित्रपट व मालिकांतील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि सेलिब्रिटी अँकर, कॉमेडी तडका फेम अभिनेता ओम यादव यांच्या उपस्थितीने सांस्कृतिक सौंदर्य प्राप्त झाले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मीडिया प्रतिनिधींनी देखील हजेरी लावली:

श्री. दीपक जागे, मॅनेजर – लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस ग्रुप
श्री. विजय राणे, डायरेक्टर – स्वामी समर्थ पीआर एजन्सी
श्री. सुभाष जैस्वाल, बिझनेस हेड – सकाळ मीडिया ग्रुप
श्री. राहुल गडपले, चीफ एडिटर – सकाळ मीडिया ग्रुप
जैस्मिन बालन – नवभारत
श्री. स्टीव्हन सिंग, व्हाइस प्रेसिडेंट – नवभारत

कार्यक्रमाचा मुख्य क्षण ठरला JPrime Buildcon चे एम.डी. श्री. अविनाश जगदाळे यांचे प्रेरणादायी भाषण. त्यांनी ‘मुंबई 3.0’ या नव्या शहर विकास संकल्पनेबद्दल आपली भूमिका मांडली – जे महाराष्ट्रासाठी अधिक स्मार्ट, आधुनिक आणि सुसंगत भविष्याकडे एक धोरणात्मक पाऊल आहे.

त्यांनी विशेषतः पुष्पक नगर परिसराची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अटल सेतू यांच्या नजीक असलेल्या या भागात येत्या काळात गुंतवणूक, पायाभूत सुविधा व जीवनशैलीत मोठे बदल घडतील, असे ते म्हणाले.

सदर कार्यक्रमात JPrime Buildcon ने मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या Channel partners ला पारितोषिक देऊन सन्मानित केले. तसेच, अरिवली, गिरवले आणि आष्टे या MSRDC अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी JPrime Buildcon चे आगामी टाउनशिप प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले – जे भविष्यातील आधुनिक, नियोजित शहरांच्या दिशेने एक पाऊल आहे.

‘Sankalp 2025’ ही केवळ एक बिझनेस मीट नव्हती, तर ती एकता, दृष्टी आणि पुढील यशाच्या दिशेने उभारलेली शिडी होती – जी JPrime Buildcon च्या वाढत्या चॅनल पार्टनर नेटवर्क साठी एक प्रेरणास्थान ठरली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!