आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी डोळ्यांची काळजी घ्या : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

 

        सांगली  : राज्यातील अनेक भागात पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ येताना दिसत आहे. डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे ही लक्षणे आहेत. यासाठी नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.

            डोळ्यांची काळजी घेण्यासाठी डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. इतर व्यक्तिंच्या रूमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये. डोळ्यांना सतत स्पर्श करू नये. उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे डोळ्यात टाकावीत. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. कदम यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!