महाराष्ट्र

मिरज – सांगली शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या मोटार सायकल रॅली, सभेच्या अनुषंगाने वाहनांसाठी मनाई आदेश जारी

 

        सांगली  मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीने दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी मिरज व सांगली शहरात मोटार सायकल रॅली व राम मंदीर चौक सांगली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक (स्त्री, पुरुष, मुले) सामील होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्यये दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी सांगली व मिरज शहरातील पुढील मार्गावर पोलीस वाहने, अॅम्बुलन्स, फायर बिग्रेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना पुढीलप्रमणे मनाई आदेश लागू केला आहे.

रॅली व सभेकरीता येणाऱ्या नागरिकांसाठी सांगली शहरात प्रवेश करण्याकरीता असणारी सर्व प्रवेश मार्गाची माहिती.  एंट्री पाँईटचे नाव –  मिरजकडून येण्याकरीता विजयनगर चौक, आलदर चौक, कोल्हापुर रोडकडून येण्याकरीता इनाम धामणी रोड मार्गे, कोल्हापुर रोडकडून येण्याकरीता टी जंक्शन मार्गे, इस्लामपुर रोडकडून येण्याकरीता सांगलीवाडी मार्गे, इस्लामपुर रोडकडून येण्याकरीता बायपास रोड मार्गे कॉलेज कॉर्नर, विटा, तासगांवकडून येण्याकरीता संजयनगर मार्गे लव्हली सर्कल / लक्ष्मीमंदीर चौक, पलुस, कुंडलकडून येण्याकरीता बायपास रोड, कॉलेज कॉर्नर.

            रॅलीमधील मुख्य मार्गावर (विश्रामबाग चौक ते राममंदीर चौक) कडे येणारे सर्व रस्ते, गल्ली, बोळ या ठिकाणी मोर्चा कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद असलेली ठिकाणे. पॉईंटचे नांव / लाकडी बैरीकेटींग  – नविन ओव्हर ब्रिजचे दोन्ही बाजूस विश्रामबाग चौक ते कुपवाड जाणारे रोडवर,  आलदर चौक – मिरजकडून येणारे रस्त्यावर,  आदीत्य हॉस्पीटल/ खरे मंगल कार्यालय कॉर्नर, अय्यंगार बेकरी कॉर्नर 100 फुटीकडे जाणारा रस्ता, डॉ. निटवे हॉस्पीटल कॉर्नर – हनुमान हॉटेलकडे जाणारा रस्ता,  डॉ. सुधाकर जाधव हॉस्पीटल कॉर्नर – वैष्णवी लॅबकडे जाणारा रस्ता, डॉ. लिमये दवाखाना कॉर्नर,  श्री. कुलकर्णी यांचे निवासस्थानाजवळील रस्ता – सर्व्हीस रोडलगत्त, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला चौक – सह्याद्रीनगरकडून येणारा रस्ता,  कृष्णा मॅरेज हॉल प्रवेशद्वारासमोर  नविन ब्रिजजवळील कॉर्नर, जुना बाटा शोरुम कॉर्नर / कोकण फिश – गणपती मंदीराकडे जाणारा रस्ता, डॉ. सुभाष पाटील हॉस्पीटल कॉर्नर, टाटा पेट्रोल पंप चौक – नेमिनाथनगरकडे जाणारा रस्ता, चंदू काका सराफ ज्वेलर्स – उद्योग भवनकडून येणारा रस्ता, उद्योग भवन कॉर्नरकडून येणारा रस्ता / टाटा पेट्रोल पंप चौक, हॉटेल देवगिरी कॉर्नर सर्व्हीस रोड – सर्व्हीस रोड,  हॉटेल ग्रेट मराठाच्या पश्चिमेकडील रस्ता,  मार्केट यार्ड चौक, बापट मळ्याकडे जाणारा रस्ता – बापट मळ्याकडून येणारा रस्ता, मार्केट यार्डात प्रवेश करणारी दोन्ही गेट, देवचंद मेडीकोचे पुर्वेकडील रस्ता, दामाणी हायस्कूलकडे जाणारे रोडवर – सर्व्हीस रोडवर, चांदणी चौकाकडे जाणारा रस्ता, चाटे कोचिंग क्लासेस सर्व्हस रोड,  जुने रोहिणी हॉटेल कॉर्नर पुष्पराज चौक,  पुष्पराज चौक / काळ्या खणीकडून येणारा रस्ता,  हॉटेल नटराज अॅनेक्स कॉर्नर पुष्पराज चौक,  डॉ. मोडक हॉस्पीटल कॉर्नर, पुढारी भवन कॉर्नर,  प्रेस्टीज कुकर दुकान, पंचमुखी मारुती रोड कॉर्नर, वेलणकर मंगल कार्यालयासमोर काँग्रेस भवन चौकातुन येणारा रस्ता, डॉ. चोपडे हॉस्पीटलचे पाठीमागील बाजूस राममंदीर चौकाकडून येणारा रस्ता,  काँगेस भवन चौक – राममंदीर चौकाकडे जाणारा रस्ता, आपटा पोलीस चौकी, वाहन तळ कॉर्नर, सिव्हील हॉस्पीटल चौक.

 

मोर्चाच्या अनुषगांने पर्यायी वाहतुक व्यवस्था

        पर्यायी वाहतुक मार्ग  – मिरज शहरातून सांगलीकडे येणाऱ्या जड वाहतुकीच्या वाहनांसाठी – गांधी चौक मिरज एम आय डी सी मार्गे – कुपवाड एम.आय.डी.सी.  – कुपवाड – भारत सुतगिरणी – लक्ष्मीमंदीर चौक – जुना कुपवाड रोड – अहिल्यादेवी होळकर चौक – शिंदे मळा – टिंबर एरीया – कॉलेज कॉर्नर मार्गे शहरात येता व जाता येईल (परतीचा मार्ग तोच राहिल).

            मिरजकडून येणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग – गांधी चौक  – सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पीटल – कृपामाईजवळील हनुमान मंदीर मार्गे – बायपास रोड – पालवी हॉटेल मार्गे – भारत सुतगिरणी चौक – लक्ष्मीमंदीर चौक – जुना कुपवाड रोड – अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे शहरात येता व जाता येईल (परतीचा मार्ग तोच राहिल).

            मिरजकडून सांगलीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी – आलदर चौकातून डावीकडे वळण घेऊन – एम. एस.ई.बी. कॉर्नर – १०० फुटी रोड – शांतीबन चौक – त्रिमूर्ती कॉलनी – डी मार्ट – शामरावनगर एकता चौक – पत्रकारनगर कॉर्नर मार्गे सांगली शहरात येता व परत जाता येईल (परतीचा मार्ग तोच राहिल).

             कुपवाड कडुन येणारे वाहनासाठी  – लक्ष्मीमंदीर चौक कुपवाड रोड – मंगळवार बाजार – जुना कुपवाड रोड –

अहिल्यादेवी होळकर चौक – टिंबर एरीया – कॉलेज कॉर्नर – आमराई चौक – वखारभाग मार्गे राजवाडा व शहरात येता व जाता येईल (परतीचा मार्ग तीथ राहिल).

            तासगाव विटा कडून येणारे जाणारे वाहनासाठी – संपत चौक – औद्योगिक वसाहत – संजयनगर १०० फुटी रोड -अहिल्यादेवी होळकर चौकातुन उजवीकडे वळण घेऊन – जुना बालाजी मिल रोड किंवा टिंबर एरीया – कॉलेज कॉर्नर –  आमराई चौक  – वखारभाग मार्गे राजवाडा व शहरात येता व जाता येईल (परतीचा मार्ग तोच राहिल).

            कर्नाळ, पलुसकडून येणारे जाणारे वाहनांसाठी – कर्नाळ रोड – शिवशंभो चौक – बायपास रोड – जुना बुधगांव टोल नाका चौक – पट्टणशेट्टी होंडा शोरुम कॉर्नर – कॉलेज कॉर्नर चौक – आमराई चौक – वखारभाग मार्ग राजवाडा व शहरात येता व जाता येईल (परतीचा मार्ग तोच राहिल).

मोर्चाकरीता येणाऱ्या नागरीकांसाठी पार्कींग व्यवस्था – पार्किंग ठिकाणे

            कोल्हापुर कडून येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – अंकली ते कोल्हापुर रोडवर रस्त्याचे कडेला  – चार चाकी, आदिसागर मंगल कार्यालय पार्कीग – चार चाकी, कल्पद्रुम क्रिडांगण नेमीनाथनगर – चार चाकी व दुचाकी,  कोल्हापुर रोड जुना जकात नाका ते कोल्हापुर रोड शास्त्री चौक रस्त्याचे बाजुस – चाकी चार, दामाणी हायस्कुलचे मैदान.

            मिरज कडून येणारे वाहनांसाठी पार्कंग व्यवस्था –  समृध्दी आय टी पार्कजवळ वि.बाग रेल्वे स्टेशन – चार चाकी, चिंतामण कॉलेज मैदान – चार चाकी, दुचाकी,  विलिंग्डन कॉलेज – चार चाकी / दुचाकी पार्कीग,  वालचंद कॉलेज चारचाकी / दुचाकी पार्कीग, कांतीलाल शहा प्रशाला – चारचाकी / दुचाकी पार्कीग, कृषी कॉलेज – दुचाकी पार्कीग, आलदर चौक ते वालचंद कॉलेज चौक रस्त्याचे कडेला दुचाकी पार्कीग.

            तासगांव, विटा, कवठेमहंकाळ, जतकडून येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – लक्ष्मी मंदीर ते १०० फुटी जाणारे रोडवर – चिन्मय पार्क दोन्ही बाजूस  – चार चाकी पार्कीग, वसंतदादा कुस्ती केंद्र तालीम जवळ – चारचाकी, नव महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मीनगर – चारचाकी,  पोदार इंटरनॅशनल स्कुलजवळील रस्त्याचे कडेला, सह्याद्रीनगर शाळा नं. 23 जवळील रिकामे मैदान – दुचाकी,  उद्योग भवनच्या पश्चिमेकडील रिकाम्या जागेत, कुपवाड फाटा कॉर्नर – चारचाकी, मंगळवार बाजार चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा १०० फुटी रोड – चारचाकी, मार्केट यार्डातील आतील बाजुचे सर्व रस्त्यांवर.

            इस्लामपुर, पलुस कुंडलकडुन येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम – चार चाकी, छ. शिवाजी महाराज स्टेडीमयजवळ – दुचाकी, तात्यासाहेब मळा – चार चाकी,  वखारभाग ते ईदगाह मैदान रस्ता – चार चाकी, सर्कीट हाऊस ते मल्टील्फेक्स जाणारा रस्ता – चार चाकी,  वखारभाग आतील गल्ली रस्ते – दुचाकी, चार चाकी,  सांगलीवाडी ते जुना सांगलीवाडी टोल नाका रस्त्याचे दोन्ही बाजुस – चार चाकी,  चिंचबाग सांगलीवाडी मैदान – चार चाकी,  वैरणबाजार – चार चाकी, भावे नाट्यगृहाचे आत – चार चाकी, गणपती पेठ – रस्त्याचे दोन्ही बाजुस कडेला – चार चाकी.

            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!