अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस 7262 वतीने सफाई कामगारांच्या विविध मागण्यांचे धाराशिव आयुक्तांना निवेदन

धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) -: अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस 7262 वतीने सफाई कामगारांचे मागण्याचे निवेदन जिल्हा सहाय्यक आयुक्त नगर विकास प्रशासन कार्यालय धाराशिव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे या मागण्या खालील प्रमाणे अनुकंपा धारकांना लाड पागे समिती शिफारशीनुसार सेवेत घेण्याबाबत व मालकी हक्क निवासस्थान देण्यात यावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेचा काटेकोर पणाने अंमलबजावणी करण्यात यावा तसेच 1975 ते 24 2 2023 च्या शासन आदेशाप्रमाणे सर्व प्रलंबित वारस हक्काचे प्रकरण निकाली काढून त्यांना सेवेत सामान घेण्यात यावा असे निवेदन माननीय श्री बाली मंडेपु प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय 72 62 महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजू मारोडा, धाराशिव चे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव, सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दशरथ अडाकुल, शहर सचिव सोलापूर व्यंकटेश देवनलु ,तुळजापूर तालुका अध्यक्ष गुलाब वाळा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते