माथेरान येथील माजी नगरसेवक नासिर शारवान, माजी उप नगराध्यक्षा विनिता गुप्ता यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा

मुकुंद रांजणे (माथेरान) : –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील न भूतो न भविष्यती अशा प्रकारे केलेली भरमसाठ विकासकामे पाहता सद्यस्थितीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे पारडे जड दिसत असून त्यांनी माथेरानसाठी सुध्दा केलेली विकासाकामे लक्षात घेता आगामी काळात सुध्दा आमदारांच्या माध्यमातून माथेरान शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाणार आहेत.त्यामुळे अशा कार्यक्षम व्यक्तीला पाठींबा दिल्यास निश्चितच माथेरान मध्ये विकासाची गंगा येऊन इथे रोजगाराच्या संधी सर्वसामान्य लोकांना मिळणार आहेत. ही पर्यटन नगरी अधिकाधिक बहरणार आहे ही बाब लक्षात घेऊन माथेरान मधील माजी नगरसेवक नासिर शारवान यांसह माजी उप नगराध्यक्षा विनिता गुप्ता यांनी व्यक्तिशः या विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.माथेरान शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे संघटक मनोज खेडकर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांसारखे निस्वार्थी लोक आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची धुरा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. यांच्या सोबतीने हळुहळू पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. विविध पक्षाची मंडळी शिंदे गटात स्वेच्छेने पक्षप्रवेश करत आहेत.याचा फायदा विधानसभा निवडणुकीत कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांना निश्चितच होणार असून मताधिक्य वाढण्यासाठी कार्यकर्ते सुध्दा तितक्याच ताकदीने कामाला लागले आहेत.